नवी दिल्ली – लहान मुलांना बाटलीच्या मदतीने दूध पाजल्यास त्याद्वारे मायक्रोप्लास्टिक्स गिळले जाण्याशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. एका नव्या संशोधनातून हे वृत्त समोर आले आहे. दुधाद्वारे प्लॅस्टिकच्या लहान कणांचे सेवन झाल्यास त्याचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे लहान मुलाना प्लॅस्टिकच्या बॉटलद्वारे दूध पाजू नये असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
आयर्लंडमधील संशोधकांनी प्लास्टिकच्या बाटल्या किंवा पॉलीप्रोपायलीनपासून बनवलेल्या वस्तूंचे ब्रेकडाउन दर शोधले आहेत. सर्वात जास्त वापरले जाणारे प्लास्टिक असल्याचे यात निष्पन्न झाले आहे. संशोधकांनी दूध कसे तयार करावे आणि निर्जंतुकीकरण कसे करावे यासंबंधी जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकृत मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण केले आहे. २१ दिवसांच्या चाचणीतून हे संशोधन समोर आले आहे. यादरम्यान प्रतिलिटर १३ लाखा पासून १.६२ कोटी प्लास्टिक मायक्रोपार्टिकल्स आढळल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. लहानमुले पहिल्या १२ महिन्यांत दररोज सरासरी १० दशलक्ष मायक्रोपार्टिकल्स गिळत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. हे संशोधन ‘नेचर फूड’ जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामुळे लहान मुलांना बाटलीद्वारे दूध न देता एखाद्या भांड्यातून द्वारे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.