नाशिक – बांधकाम व्यवसायात सुयोग्य प्लंबिंग अत्यावश्यक समजले जाते. प्लंबिंग विषयी ज्ञान सामायिकरण आणि कौशल्य वाढविणारी स्पर्धा म्हणजेचं इंडियन प्लंबिंग प्रोफेशनल लीग (आयपीपीएल ) चेे आयोजन करण्यात आले आहे. २६ सप्टेंबर ते २२ नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या नाशिक शाखेद्वारे स्पर्धा करण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष मिलिंद शेटे यांनी दिली आहे. यंदा स्पर्धेचे चौथे वर्ष असून यावर्षी ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेद्वारे मजेशीर शिक्षण यातून मिळणार असल्याचे शेटे यांनी म्हटले आहे.
बांधकाम क्षेत्रात प्लंबिंग महत्त्वपूर्ण असून तांत्रिक प्रगतीमुळे, नवीन प्लंबिंग तंत्र आणि उत्पादनाची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी आधुनिक तंत्र अवगत करायला हवे यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आयपीपीएलची माहिती व प्रश्नमंजुषा स्वरुपात आयोजित करण्यात आला आहे. तज्ज्ञांकडून व्यावसायिक पद्धतीने उत्तम, नाविन्यपूर्ण आणि नवनवीन प्लंबिंग पद्धतींचे माहिती देण्यात येणार आहे. यंदा डिजिटल पद्धतीने स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. नामवंत तज्ञांकडून प्लंबिंगबद्दल शिकण्याची संधी मिळणार आहे अशी माहिती इंडियन प्लंबिंग असोसिएशन (नाशिक चेप्टर) चे अध्यक्ष मिलिंद शेटे यांनी दिली आहे.
पुढील सत्रांचे आयोजन
पाणीपुरवठा व वितरण, पंपिंग आणि हायड्रो – न्युमेटिक प्रणाली, फिक्स्चर / फिटिंग्ज / व्हॉल्व्हज आणि अपुर्टेनेसेस, हॉट वॉटर सिस्टम, डब्ल्यूटीपी आणि एसटीपी, पाण्याचे कार्यक्षम प्लंबिंग उत्पादने ,इंडिया कोड, पाण्याचा निचरा ,रेन वॉटर हार्वेस्टिंग टर्मिनॉल्स, कोड आणि मानक सेनेटरी ड्रेनेज सिस्टम, अप्रत्यक्ष कचरा या विषयांवरील सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.