मुंबई – अभिनेत्री अनुष्का शर्मा एका जाहिरातीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सेटवर परतली आहे. गॅपनंतर शूटिंग केल्याने मला खूप बरं वाटत असल्याचे तिने सांगितले. अनुष्का शर्मा गरोदर असून सध्या एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी ती मुंबईत आली आहे.
सेटवर अनुष्का एकदम खुश दिसत असल्याचे एका प्रेक्षकाने सांगितले. सेटला खूप मिस केल्याचे तिने यावेळी सांगितले. गरोदर असली तरी अनुष्काच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव नव्हता. ती खूप आनंदात होती. तसेच शूटिंगसाठी जरी ती आली असली, तरी तिने सेटवर सगळ्या गोष्टींची नीट काळजी घेतली होती.
शूटिंगसाठी तयार होतानाचा मिरर सेल्फी अनुष्काने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली. हिरव्या गाऊनमधे आलेली अनुष्का एकदम मस्त दिसत होती. जानेवारीमध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर मे महिन्यापासून पुन्हा ती काम करण्याची शक्यता आहे.