नवी दिल्ली – अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला तिच्या अडचणीच्या काळात मदत करून अभिनेता हृतिक रोशन तिच्यासाठी रिअल लाईफ हिरो ठरला. स्वतः प्रियंकानेच आपल्या ‘अनफिनिषड’ या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात याची माहिती दिली आहे.
प्रियांकाचे आपल्या वडिलांवर, डॉ. अशोक चोप्रा यांच्यावर प्रचंड प्रेम. ते जेंव्हा आजारी पडले तेंव्हा हृतिक रोशनने तिची खूप मदत केली. त्यांना कॅन्सर झाला होता. आणि चांगल्या डॉक्टरकडून त्यांचे उपचार व्हावेत, यासाठी हृतिकने खूप प्रयत्न केले. लंडनला नेऊन त्यांच्यावर चांगले उपचार व्हावेत यासाठी त्याने स्वतःचे कॉन्टॅक्ट वापरून एअर इंडियाच्या विमानाची व्यवस्थाही केल्याचे प्रियांका सांगते.










