मुंबई – बॉलिवूडसोबतच हॉलीवूडमध्येही स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या प्रियांका चोप्राने नुकताच आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. अमेरिकन गायक आणि अभिनेता निक जोनास याच्याशी दोन वर्षांपूर्वी लग्न करून तिने सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. या निमित्ताने तिने आपल्या लग्नातील काही अप्रसिद्ध फोटो प्रसिद्ध केले आहेत.
प्रियांका सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. आपल्या फॅन्सना ती नेहमी काही न काही अपडेट देत असते. त्यामुळेच लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्ताने तिने पाच अप्रसिद्ध फोटो इंस्टाग्रामवर टाकले आहेत. यात ती पती निकसोबत खूपच रोमँटिक झालेली दिसते आहे. यातील दोन फोटोंमध्ये ती लग्नाच्या लाल रंगाच्या जोड्यात अत्यंत सुंदर दिसते आहे. या दोघांचेही हे फोटो अत्यंत सुंदर आहेत. यातील शेवटचा फोटो निकला वरमाला घालतानाचा आहे. त्यात प्रियांका सोबत निकचेही नातेवाईक दिसत आहेत.
हे सगळे फोटो शेअर करताना तिने निकला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. या दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. आणि त्यावर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस पडतो आहे.