मुंबई – सुपरहिट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने सांताक्लॉजच्या आधीच मुलांना ख्रिसमस गिफ्ट दिले आहे. प्रियांका चोप्रा अभिनित हॉलिवूडपट ‘वुई कॅन बी हिरोज’ नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. हा मुलांसाठीचा चित्रपट असून तो नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अर्थात १ जानेवारी रोजी रिलीज होणार होता.
हा चित्रपट रिलीज झाल्याची माहिती प्रियांकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना दिली. या चित्रपटाचे दिग्दर्शन रॉबर्ट रॉड्रीग्स यांनी केले आहे. प्रियांकाने या चित्रपटातल आपल्या बाकी सहकलाकारांची ओळखही चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून करून दिली होती. प्रियांकाची या चित्रपटात निगेटिव्ह भूमिका आहे.
यापूर्वी प्रियांकाने चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना म्हटले होते की, या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान मला खूप मजा आली. यात रॉबर्ट रॉड्रीग्स आणि मुलांचा खूप मोठा वाटा असल्याचेही ती सांगते.
प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. अभिनयासोबतच ती आता चित्रपट निर्मिती देखील करत आहे. नेटफ्लिक्सवर काही दिवसांपूर्वी ‘द व्हाइट टायगर’ चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला. यात प्रियांका अभिनयासोबतच एक्झिक्युटिव्ह निर्माता म्हणूनही काम पहात आहे. याशिवाय प्रियांका अमेझॉन स्टुडिओसोबतही काम करत आहे. तिचा एक चित्रपट अमेझॉन प्राईमवर रिलीज झाला आहे.
बघा या चित्रपटाचा ट्रेलर