नवी दिल्ली – ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स विल्यम यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. मात्र, एप्रिल २०२० मध्ये त्यांनी याबाबत कोणताही खुलासा केला नाही. ही माहिती संपूर्ण गोपनीय ठेवण्यात आली. याबाबत ब्रिटीश माध्यमांनी खुलासा केला आहे.
ब्रिटीश माध्यमांनी कॅसिंग्टन पॅलेसला याबाबत माहिती दिली आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर उपचार घेऊन बरे झाल्यावर देखील त्यांनी याबाबत माहिती उघड केली नाही. देश धोक्यात येऊ शकतो याभीतीने त्यांनी असे केले अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. वडील प्रिंस चार्ल्स यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचवेळी राजकुमार प्रिन्स विल्यम यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याआधी मार्च महिन्यात ग्रेट ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिश जॉनसन यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. जगभरात सदर प्रकारची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.