बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

प्रायोगिक धडपडीतून रंगभूमीला डिजीटल उभारी, १८ पासून ऑनलाईन नाट्यमहोत्सव

ऑक्टोबर 8, 2020 | 1:35 pm
in संमिश्र वार्ता
0
8cd95307 4554 48ae af1f aa346ff19890

 

शब्दांची रोजनिशी, घटोत्कच आणि हंडाभर चांदण्याचा प्रयोग रंगणार !

नाशिक : करोनाच्या संकटामुळे महाराष्ट्रातील रंगभूमीवरची चळवळ गेल्या सुमारे सात महिन्यांपासून थंडावलेली असताना पुणे, मुंबई, नाशिकमधील काही रंगकर्मींनी मात्र यावर मात करीत ऑनलाईनचा वापर करीत ‘डीजीटल प्रायोगिक धडपड’ सुरू केली आहे. यापैकीच कल्याण येथील अभिजीत झुंजारराव यांच्या अभिनय, कल्याण या संस्थेच्या वतीने ऑनलाईन थिएटर प्रिमिअर लीग सुरू करण्यात येऊन निवडक गाजलेल्या नाटकांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. १८ ऑक्टोबरपासून सुरू होणा-या या महोत्सवात पुण्याचे नाटक घर निर्मित, रामू रामनाथन दिग्दर्शित आणि अतुल पेठे दिग्दर्शित ‘शब्दांची रोजनिशी’, १९ ऑक्टोबर रोजी डॉ.आशुतोष दिवाणलिखित व अभिजीत झुंजारराव दिग्दर्शित ‘घटोत्कच’ आणि २० ऑक्टोबर रोजी नाशिकचे प्रमोद गायकवाडनिर्मित, दत्ता पाटीललिखित व सचिन शिंदे दिग्दर्शित ‘हंडाभर चांदण्या’ ही भारतभर विविध महोत्सव गाजवलेली नाटके ऑनलाईन बघण्याची संधी जगभरातील रसिकांना प्राप्त होणार आहे.

5a5e2829 fa94 4048 bc2b 6266800cc737

करोनाकाळात अनेक उद्योगव्यवसायांसोबतच मराठी रंगभूमीलाही मोठा फटका बसला. बॅकस्टेज आर्टीस्ट यांना सर्वाधिक फटका बसला. व्यावसायिक रंगभूमी ठप्प झाली. प्रायोगिक रंगभूमीही थांबली. संकटावर सतत मात करण्याची प्रवृत्ती कलावंतांमध्ये उपजत असते. त्यातून ऑनलाईन मंचाचा वापर करून आपल्या रसिकजनांशी मराठी नाट्यकर्मींनी वेगवेगळ्या प्रयोगाद्वारे, कल्पकतेने नवा संवादसेतू बांधण्याचे काम केले. दृकश्राव्य माध्यमाद्वारे नाटकाची अनुभूती घ्यायला मराठी रसिक तसा नाखूष असतो. परंतु या काळात नाट्यगृहांमध्ये प्रयोग करणे शक्य नसल्याने दृकश्राव्य माध्यमाद्वारे का होईना, आपली नाट्यकृती रसिकजनांपर्यंत पोहोचविण्याची धडपड अभिजीत झुंजारराव यांच्या संस्थेने सुरू केली आहे.

शब्दांची रोजनिशी

दिनांक १८ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री ८ वाजता सादर होणार्या ‘शब्दांची रोजनिशी’ या नाटकात दोन कथा आहेत. जगातील कुठल्याही भाषेत असतात तशा त्या सुरस आणि चमत्कारिक आहेत. अशा कथा मनोरंजन करतात आणि क्लेशही देतात. त्या अनाकलनीय, अतर्क्य,  अघटित इ. इ. असतात. त्या ख-या किंवा कल्पित असतात. अशा कहाण्यांची ही अनोखी गोष्ट आहे. एक  गोष्ट मात्र  निश्चितपणे  सांगता येईल की शब्दांची रोजनिशी हा अस्सल नाट्यानुभव आहे. रामू रामनाथन यांनी लिहिलेले हे नाटक अमर देवगावकर यांनी अनुवादित केले आहे. प्रयोगशील नाट्यकर्मी अतुल पेठे यांनी ते दिग्दर्शित केले आहे. केतकी थत्ते आणि स्वत: अतुल पेठे यात भूमिका करीत आहेत.

घटोत्कच

दिनांक १९ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री ८ वाजता सादर होणारे ‘घटोत्कच’ हे नाटक डॉ. आशुतोष दिवाण यांनी लिहिले असून अभिजीत झुंजारराव यांनी दिग्दर्शित केले आहे. महाभारतातील घटोत्कच या व्यक्तिरेखेला समकालिन वास्तवाची अदृश्य किनार देत राजकीय पक्षांच्या कार्यात जीवतोडून काम करणार्या नि शेवटी डावलल्या जाणार्या प्रत्येक कार्यकर्त्यात एक घटोत्कच असतोच, हे अधोरेखित केले आहे. भीम आणि हिडींबा यांचा पुत्र असलेला घटोत्कच महाभारतातील युद्धात ओढला जातो आणि लढतानाही हिंसा, राजकारण, आपल्याच वाटणार्या माणसांची अनाकलनीय वागणूक हे पहातो. युद्धज्वरात सज्जन वाटणारे राज्यकर्तेही किती निष्ठूर होतात किंबहुना त्यांना व्हावेच लागते,याचे या नाटकात दर्शन होते. राहूल शिरसाठ, हरीश भिसे, अभिनय तालखेडकर, राजन पंधे, ऋचिका खैरनार, श्रेयसी वैद्य यांच्या भूमिका असलेले, तसेच अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी नावाजलेले हे नाटक रसिकांसाठी पर्वणी ठरेल.

हंडाभर चांदण्या

दिनांक २० ऑक्टोबर २०२० रोजी रात्री ८ वाजता या महोत्सवात सादर होणारे शेवटचे नाटक म्हणजे ‘हंडाभर चांदण्या’. या नाटकाने प्रायोगिक रंगभूमीला एक नवे वळण दिले, असे म्हटले जाते. या नाटकातून पाण्याचा अत्यंत भीषण प्रश्न वेगळ्या पद्धतीने मांडला आहे. पाण्याच्या टँकरची डोळ्यात प्राण आणून वाट पाहण्यासाठी माळावर जमलेल्या छोट्याशा दुष्काळी गावातील विलक्षण गोष्ट यात मांडली आहे. लोकसंगिताच्या प्रभावी माध्यमातून सद्यस्थितीवर साध्या जगण्यातून उपहासात्मक भाष्य करणारे हे नाटक दत्ता पाटील यांनी लिहिले असून, सचिन शिंदे यांनी दिग्दर्शित केले आहे. प्रमोद गायकवाड हे निर्माते असून, प्राजक्त देशमुख, प्रणव पगारे, दीप्ती चंद्रात्रे, गीतांजली घोरपडे, नुपूर सावजी, अरूण इंगळे, राहूल गायकवाड, राजेंद्र उगले, दत्ता अलगट, धनंजय गोसावी यांच्या भूमिका आहेत.

या महोत्सवासाठी ऑनलाईन तिकीटे पुढील लिंकवर उपलब्ध होतील : https://www.rangabhoomi.com/tpl2 अथवा संपर्क साधा 9967699959 या क्रमांकावर.

8c1a7b18 eafb 493c b329 a36837ebb559

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिल्लीतला “बाबा का ढाबा” सोशल मिडीयावर तुफान व्हायरल

Next Post

नंदुरबार-पुणे शिवशाही बससेवेला प्रारंभ

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
shivshahi

नंदुरबार-पुणे शिवशाही बससेवेला प्रारंभ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011