नवी दिल्ली – मोबाईल वापरकर्त्या ग्राहकांसाठीच्या प्रस्तावित नवीन प्रायव्हसी पॉलिसीबाबत वाद निर्माण झाल्याने व्हॉट्सअॅप कंपनी आता सरकारशी बोलण्यास तयार आहे, पण व्हॉट्सअॅप सध्याचे आपले गोपनीयता धोरण मागे घेण्यास तयार नाही.
व्हॉट्सअॅपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात डेटा संरक्षणाबाबत कायदा नसतानाही प्रायव्हसी पॉलिसी किंवा डेटा संरक्षण संरक्षणाचे नियम निश्चित करण्यात कोणतीही अडचण नाही. तसेच व्हॉट्सअॅपचे प्रस्तावित धोरण ८ फेब्रुवारीपासून अंमलात येणार होते. परंतु आता वादामुळे ते धोरण १५ मे पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. नेमके काय झाले या प्रकरणाचे जाणून घेऊ या…
भारतात डेटा संरक्षण कायदा नाही : या नियमाबद्दल कंपनी सूत्रांचे म्हणणे आहे की, युरोप आणि भारतातील मोबाईलमधील समाज माध्यम सेवा वापरकर्त्यांसाठी वेगवेगळ्या गोपनीयता धोरण आहे, युरोपमध्ये जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन आहे. त्यामुळे कोणतेही धोरण किंवा नियम ठरविताना त्या नियमांची काळजी घेतली जाते, परंतु आतापर्यंत भारतात असा डेटा संरक्षण कायदा तयार झालेला नाही. अशा परिस्थितीत धोरण तयार करताना कोणाची काळजी घ्यावी, आणि कोण नाही हे ठरवणे अवघड आहे.
मंत्रालयाने व्हॉट्सअॅपला विचारला जाब : डिसेंबर २०१९ मध्ये सरकारने खासगी डेटा सुरक्षा विधेयक संसदेत सादर केले, पण आतापर्यंत त्याला कायद्याचे स्वरूप त्यांना देण्यात आले नाही. त्यामुळेच अलीकडेच इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने व्हॉट्सअॅपला आपले प्रस्तावित गोपनीयता धोरण मागे घेण्यास सांगितले आहे. मंत्रालयाने व्हॉट्सअॅपला एकूण १४ प्रश्नांची उत्तरेही मागितली आहेत, परंतु त्यांचे उत्तर देण्यासाठी मंत्रालयाकडून कोणतीही अंतिम मुदत निश्चित केलेली नाही.
भिन्न गोपनीयता धोरण का ? : व्हॉट्सअॅपचे प्रायव्हसी धोरण युरोप आणि भारतासाठी वेगळे का आहे. सूत्रांच्या माहितीनुसार युरोपमध्ये डेटा संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल कंपन्यांना भारी दंड आकारला जातो आणि डेटा संरक्षण कायद्याचे पालन केल्यास कठोर पालन केले जाते, परंतु भारतात अद्याप कोणताही कायदा नाही, त्यामुळे भिन्न धोरण दिसून येते.
डेटा सुरक्षेची काळजी नाही : मोबाईल मधील सेवा वापरकर्त्यांची माहिती नसल्याने काहीही विपरीत घडू शकते, मात्र भारतात व्यवसाय करणार्या या कंपन्यांवर कोणतीही कारवाई होत नाही, त्यामुळे या कंपन्यांना आपल्या डेटा सुरक्षेची काळजी नाही. यावर आक्षेप व्यक्त केला जात आहे.