नाशिक – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भांबर यांना उत्कृष्ट प्राचार्य अवार्ड मिळाला आहे.
२०२१ हेअल्थ अँड वेलनेस कॉनक्लेव्ह हा केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील इंडियन फार्माकोपिया,युनायटेड स्टेट्स फार्माकोपिया, इंडियन ड्रग मॅनुफॅक्चरर असोशिएशन आणि नॅशनल चेम्बर ऑफ फार्मासुटिकल् मॅनुफॅक्चरर, श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात आला. त्यामध्ये महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, पंचवटीचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भांबर यांना उत्कृष्ट प्राचार्य अवार्ड तर महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालय अवार्ड देऊन डॉ. राजेंद्र भांबर यांचा दिल्ली चे डेप्युटी ड्रग कंट्रोलर श्री. अतुल नासा, दिल्ली येथील केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील इंडियन फार्माकोपिया चे संचालक श्री. राजीव रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.









