नवी दिल्ली – दी. नॅशनल कमिशन फॉर द इंडियन सिस्टिम ऑफ मेडिसिन बिल २०२० च्या प्रस्तावित सुधारित बिलास खा.डॉ.भारती पवार यांनी संसदेत समर्थन दिले. भारतातील ऋषी मुनींनी विकसित केलेल्या पारंपरिक औषधांना भारतात नव्हे तर जगभरात मागणी आहे. दूरदृष्टी असणारे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे. ज्या देशातील नागरिक स्वस्थ व निरोगी असतील तोच देश प्रगती करू शकतो. ”जान है तो जहान है” या उक्ती प्रमाणे भारतातील पारंपरिक औषधांच्या निर्मितीसाठी त्याच्या प्रचार प्रसारासाठी दी नॅशनल कमिशन फॉर द इंडियन सिस्टिम ऑफ मेडिसिन बिल २०२० च्या कायद्यात सुधारणा करणे आवश्यक असल्याने बिल तयार करून संसदेच्या पटलावर मांडण्यात आले. आपल्या अतिप्राचीन संस्कृतीप्रगत पारंपारिक चिकित्सा पद्धतीवर अजून शोध करून त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठीच ह्या सुधारित बिलाचे त्या दिशेने पाऊल आहे. यात पारंपारीक चिकित्सा पद्धतीवर जोर दिला असून या बिलाला खा.डॉ.भारती पवार यांनी संसदेत समर्थन दिले. देशाचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांचेही या प्रसंगी खा.डॉ.पवार यांनी विशेष आभार मानले.