नवी दिल्ली – प्रसिद्ध भजन गायक नरेंद्र चंचल यांचे दिल्लीतील अपोलो रुग्णालयात उपचार घेतांना निधन झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ते आजारी होते. चंचल हे भजनासाठी प्रसिध्द होते. त्यांनी अनेक स्तोत्रांसह हिंदी चित्रपटातही गाणी गायली आहेत. १९८० मध्ये मोहम्मद रफी यांच्यासोबत तूने मुझे बुलाया शेरा वालिए व १९८३ मध्ये आशा भोसले यांच्यासोबत गायलेले चलो बुलावा आया है माता ने बुलाया है हे गीत प्रचंड गाजले होते. लता मंगेशकर यांच्यासोबत नरेंद्र चंचल यांनी महंगाई मार गई हे गाणे गायले होते. १९७३ साली बॉबी या चित्रपटासाठी गायलेल्या एका गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पुरुष प्लेबॅक पुरस्कार मिळाला होता. १९४० साली अमृतसरमध्ये एका धार्मिक पंजाबी कुटुंबात जन्मलेले चंचल यांना भजन कीर्तन आवडत.