नवी दिल्ली – न्यायव्यवस्थेविरुद्ध केलेल्या आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर पुनर्विचार करण्यासाठी, ज्येष्ठ विधीज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयानं आज (२० ऑगस्ट) दोन दिवसांची मुदत दिली. न्यायव्यवस्थेवर टीका करणारी ट्विट केल्याबद्दल, प्रशांत भूषण यांना न्यायव्यवस्थेचा अवमान केल्याच्या आरोपावरून, न्यायालयाने दोषी ठरवले आहे. भूषण यांनी मात्र माफी मागायला नकार दिला आहे. आपण याबाबत आपल्या वकिलांशी सल्लामसलत करून न्यायालयाच्या प्रस्तावावर विचार करू असे भूषण यांनी आज सुनावणी दरम्यान न्यायालयाला सांगितले आहे.