नाशिक – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे जिल्ह्यातील प्रवाशांसाठी बसेसचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शनिवारीपासून या वेळापत्रकानुसार बससेवा सुरु झाली आहे. पुणे, धुळे, औरंगाबाद, जळगाव, चोपडा, बुलढाणा, स्वारगेट, बोरीवली, मुंबई सेंट्रल, दादर, नंदुरबार येथे प्रवासासाठी बस सुविधा सुरु झाली आहे. यासंबंधी अधिकृत माहिती परिवहन मंडाळाने प्रवाशांना दिली आहे. नवीन सी.बी.एस., महामार्ग बसस्थानक, जुने सी.बी.एस. येथील वेळापत्रकानुसार बस सुटणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दर अर्धा तासाला बस सुविधा नियमीत करण्यात आल्याचे नाशिक परिवहन मंडळाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना सुखकर प्रवास करता येणार आहे.
संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक
नवीन बसस्थानक = ०२५३ – २३०९३०८
महामार्ग बस स्थानक= ०२५३ – २३०९३०९
जुने सी.बी.एस = ०२५३ – २३०९३१०
वेळापत्रक असे