नवी दिल्ली – दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर प्रभूदेवा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते प्रेमात पडले असून लवकरच बोहल्यावर चढण्याची शक्यता आहे. वाद झाल्याने काही वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या पत्नीपासून, रामलतापासून फारकत घेतली.
इ टाइम्सच्या वृत्तानुसार, प्रभुदेवा सध्या आपल्या भाचीसोबत डेट करत असल्याचे कळते. तसेच ते लग्नही करणार असल्याचे कळते. मात्र, यावर प्रभुदेवा किंवा त्यांच्या टीमकडून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.
प्रभुदेवा सध्या सलमान खानच्या ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनात व्यस्त आहे. यात सलमान खानसोबत दिशा पाटनी मुख्य भूमिकेत आहे. याशिवायही प्रभुदेवा साऊथच्या काही चित्रपटांमध्ये दिसतील.