संगमनेर – प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांना दिलासा मिळाला आहे. अपत्यप्राप्तीबाबत त्यांनी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी येथील न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. त्यास इंदोरीकर यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार जिल्हा सत्र न्यायालयाने खालच्या न्यायालयाच्या निकालास स्थगिती दिली असून याप्रकरणी पुढील सुनावणी २० ऑगस्टला होणार आहे. तोपर्यंत इंदोरीकर यांना दिलासा मिळाला आहे.