नवी दिल्ली – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कचरामुक्त भारत अभियानाची घोषणा केली आहे. आजपासून सुरू झालेले हे अभियान १५ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. राष्ट्रीय स्वच्छता केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
महात्मा गांधींच्या स्वच्छतेविषयीच्या विचारांना श्रद्धांजली म्हणून हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियानाचा कोरोना विषाणू विरोधातल्या लढ्यात मोठा हातभार असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. लहान मुलांनी सुरक्षित शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन करावे, मास्क परिधान करावे, असे आवाहन त्यांनी केले.