वॉशिंग्टन – व्हाइट हाऊसला निरोप देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना एक पत्र लिहले आहे. तथापि, त्या पत्रात काय लिहिले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. याचे कारण असे आहे की, दोघेही स्वत: ट्रम्प आणि बायडेन याविषयी माहिती देत नाहीत किंवा व्हाईट हाऊसचे अधिकारी या पत्राबद्दल सांगण्यास तयार नाहीत.
आधुनिक अमेरिकन इतिहासात अशी परंपरा आहे की, माजी अध्यक्ष आपल्या ऑफिस डेस्कवर नवीन अध्यक्षांच्या नावे एक पत्र लिहून ठेवतात. बिल क्लिंटनच्या नावाने जॉर्ज बुश यांनी लिहलेले पत्र क्लिंटनची पत्नी हिलरी यांनी सोशल मीडियावर शेअर केल्याने बरेच लोकप्रिय झाले होते. परंतु आता बायडेन त्या पत्राबद्दल काही बोलले नाहीत.
दरम्यान, मीडियाच्या रिपोर्टनुसार ट्रम्प यांचे पत्र फार मोठे नसते. याबाबत बायडेन यांना विचारले असता ते म्हणाले की, ट्रम्प यांनी माझ्यासाठी पत्र ठेवलेले असून एक वैयक्तिक पत्र आहे, म्हणून जे त्यात लिहिलेले आहे ते माध्यमांना दिले जाऊ शकत नाही. व्हाईट हाऊसनेही हे पत्र मिळाल्याचे स्पष्ट केले आहे. माजी उपाध्यक्ष माईक पेंस यांनीही नवीन उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना पत्र लिहले आहे. यालाही व्हाईट हाऊसने दुजोरा दिला आहे.
ओबामा यांनी ट्रम्प यांना पत्रही लिहिले होते. अमेरिकेमध्ये काही वर्षांपासून अशी परंपरा आहे की, व्हाईट हाऊसच्या नवीन प्रमुखांना माजी राष्ट्रपती पत्र लिहितात. याला एक नोट म्हणतात. जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी बराक ओबामा यांना एक पत्र लिहून यात त्याला शुभेच्छा दिल्या होत्या . बिल क्लिंटनसाठी बुश यांचे पत्र सर्वात लोकप्रिय ठरले होते. त्यांनी लिहिले होते. आजपासून आपण आमच्या सर्वांचे अध्यक्ष आहात. मी तुम्हाला सलाम करतो आणि तुमच्या यशासाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करतो.