नाशिक – कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून नाशिक शहरात प्रथमच सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा एकही मृत्यू झालेला नाही. शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (८ डिसेंबर) २३९ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २४१ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख ३ हजार ७९९ झाली आहे. ९८ हजार ६८० जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ८३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ३ हजार २८४ जण उपचार घेत आहेत.
मंगळवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १४२, ग्रामीण भागातील ८४, मालेगाव शहरातील २ तर जिल्ह्याबाहेरील ११ जणांचा समावेश आहे. तर, ५ मृतांमध्ये मालेगाव शहरातील १ आणि ग्रामीण भागातील ४ जणांचा समावेश आहे.
सलग दुसरा दिवस
जून महिन्यात नाशिक शहरात पहिला कोरोना बाधित आढळून आला. त्यानंतर कोरोना बाळींचे सत्र सुरू झाले. मात्र, एकही कोरोना मृत्यू झाले नसलेल्या दिवसांची संख्या शहरात अत्यल्प आहे. तर, सलग दोन दिवस एकही कोरोना मृत्यू झाले नसल्याची नोंद प्रथमच सोमवारी व मंगळवारी (७ व ८ डिसेंबर) नाशिक शहरात झाली आहे. त्यामुळे ही बाब नाशिककरांसाठी दिलासादायक आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६८ हजार ३०८. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ७५०. पूर्णपणे बरे झालेले – ६५ हजार ४५२. एकूण मृत्यू – ९२१. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ९३५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९५.८२
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३० हजार १८३. पूर्णपणे बरे झालेले – २८ हजार ३१३. एकूण मृत्यू – ६९९.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार १७१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.८०
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ३९९. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ०८२. एकूण मृत्यू – १७२.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १४५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.७९
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी