मुंबई कृषी उत्पन्ना बाजार समिती संचालक डॉ. अद्वय हिरे – पाटील यांच्या प्रयत्नांना यश
मुंबई बाजार समितीचे कार्यक्षेत्र विस्तारीत होणार
मालेगांव – मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील प्रमुख शिखर संस्थाआहे. राज्यातील एकुण सहाही महसुल विभागातील शेतक-यांचे प्रतिनिधी येथे सदस्य म्हणुन निवडून आले आहेत. या बाजार समितीचे कार्यक्षेत्र फ़क्त नवी मुंबई मर्यादित होते. ते वाढवुन संपुर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र करावे असे लेखी निवेदन या शिखर संस्थेचे संचालक, नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाचे चेअरमन तथा मालेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. अद्वय हिरे – पाटील यांनी २१ नोव्हेंबर २०२० च्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देवुन मागणी केली होती. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्यास सन २०२० – २०२१ च्या अर्थ संकल्पीय बैठकित त्यास मंजुरी देण्यात आली.
यासाठी ६ कोटींची यासाठी प्राथमिक तरतुद करण्यात आली आहे. या ऎतिहासिक कामगिरी बद्दल डॉ. हिरे – पाटील यांचे संपुर्ण महाराष्ट्रातील सर्व विभागातुन अभिनंदन करण्यात येत आहे. मुंबई बाजार समितीच्या विभागीय संचालकांना त्यांच्या भागातील शेतक-यांना मदत करण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या, देशातील पंजाब व इतर राज्यातील विभागीय कृऊबा समित्यांनी त्याचे कार्यक्षेत्र राज्य पातळीवर केले, हाच धागा पकडून मुंबई कृऊबाचे कार्यक्षेत्र वाढविण्याची मागणी डॉ. अद्वय हिरे – पाटील यांनी केली होती.
डॉ. हिरे – पाटील यांच्या महत्वपूर्ण निवेदनाचा सर्वकष विचार करुन संचालक मंडळाच्या बैठकीत कार्यक्षेत्र विस्तारीत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या संदर्भात सर्वसाधारण सभेत ठराव पारित करुन तो राज्य शासनाकडे पाठविण्यात येवून पाठपुरावा करुन मंजुर करुन घेण्यात येवुन कार्यक्षेत्रात वाढ करुन राज्याच्या प्रयेक सहाही महसुल विभागामधे प्रत्येकी १/१ उपबाजार सुरु करणेत येणार आहे. तसा प्रस्ताव देखील पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.
शेतक-यांच्या दृष्टीने अत्यंत सोयीचे
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक महसुल विभागातील शेतक-यांच्या दृष्टीने अत्यंत सोयीचे व फ़ायद्याचे होणार असल्याचे समाधान लाभेल.
डॉ. अद्वय हिरे – पाटील, संचालक