शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

प्रत्येक नाशिककर हा असेल साहित्य संमेलनाचा  स्वागताध्यक्ष- पालकमंत्री  भुजबळ

जानेवारी 31, 2021 | 11:31 am
in इतर
0
IMG 20210131 WA0032

  • नाशिकच्या साहित्य संमेलनस्थळाला ‘कुसुमाग्रजांचे नाव
  •  संमेलन यशस्वी करण्याची जबाबदारी आपण सर्व नाशिककरांची- पालकमंत्री  भुजबळ

    नाशिक –  नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात देशभरातून येणाऱ्या प्रत्येकाचा यथोचित सन्मान व्हावा ; नाशिकचे साहित्य संमेलन संस्मरणीय व्हावे यासाठी माझ्यासह नाशिकच्या प्रत्येक नागरीकाने स्वागताध्यक्षाच्या भुमिकेतून  संमेलन यशस्वी करण्याची जबाबदारी खांद्यावर घ्यावी, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले आहे.

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या अनुषंगाने गोखले एज्युकेशन सोसायटी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ बोलत होते. यावेळी यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयवंतराव जाधव, महापालिकेचे अप्पर आयुक्त सुरेश खाडे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, उपायुक्त मनोज घोडे पाटील, डॉ.मो.सो.गोसावी, चंद्रकांत महामीने, नगरसेवक शाहू खैरे, गजानन शेलार, जयप्रकाश जतेगावकर, शंकर बोऱ्हाडे, डॉ.कैलास कमोद, दिलीप खैरे, वसंत खैरनार, श्रीकांत बेनी, दत्ता पाटील, विनायक रानडे, रंजन ठाकरे, लक्ष्मण सावजी यांच्यासह नाशिक शहरातील साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

    संमेलनस्थळाला ‘कुसुमाग्रज नगरी’ म्हणून नामकरण

  • पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला देशभरातून साहित्यिक येणार आहेत. याचे सगळे नियोजन करण्याची जबाबदारी स्वागतध्यक्ष म्हणून व एक नाशिककर म्हणून मी पार पाडणार आहे. तसेच नाशिकमध्ये होणाऱ्या संमेलनस्थळाला ‘कुसुमाग्रज नगरी’ म्हणून नामकरण केले असल्याचे, पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी जाहीर केले.

    घरोघरी उभारा सहभागाची , सन्मानाची गुढी

    संमेलनाचा उत्साह आणि आनंद हा केवळ साहित्य संमेलनाचे आयोजन असलेल्या वास्तूभोवती न राहता संपूर्ण शहरात त्याचे प्रतिबिंब उमटायला हवे. यासाठी प्रत्येक नाशिककराने संमेलन काळात आपल्या घरावर या सन्मानाची आणि साहित्य सोहळ्याची गुढी उभारावी. जेणेकरून या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या शहरात आलेल्या साहित्यिक आणि मान्यवरांच्या मनावर प्रभाव पडेल की, प्रत्येक नाशिककर या सोहळ्यात तितक्यात तन्मयतेने सहभागी झाला आहे, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

    शासनामार्फत ५० लाखांचा निधी मंजूर

  • या संमेलनास शासनामार्फत ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून, आमदार निधी मधूनही मदत दिली जाणार आहे. येत्या ५० दिवसांत सूक्ष्म नियोजन करुन संमेलनाची परिपूर्ण नियोजन करण्यात यावे. तसेच संमेलनासाठी आवश्यक असलेल्या सर्व समित्या लवकरात लवकर गठीत करण्याची सूचनाही पालकमंत्री भुजबळ यांनी आयोजकांना केली.

    संमेलनाच्या काटेकोर नियोजन

  • संमेलनाच्या काटेकोर नियोजनासाठी पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, महानगरपालिका, महावितरण आदी विभागांतील अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच संमेलनाच्या अनुषंगाने आलेल्या सूचनावंरही योग्य ती अंमलबजावणी करण्यात येईल असेही, पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

    संमेलन वर्षानुवर्ष लोकांच्या लक्षात राहील

  • नाशिकमध्ये होणारे संमेलन वर्षानुवर्ष लोकांच्या लक्षात राहील यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येईल. तसेच यासाठी प्रत्येकाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे  आवाहनही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी केले.  माध्यमांनी देखील संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य व योगदान देण्याचे आवाहन पालकमंत्री भुजबळ यांनी केले.  तसेच कोरोनाचा प्रादूर्भाव अजून संपलेला नसल्याने संमेलन काळात कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जावे. तसेच त्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्याची सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी केली.

    महानगरपालिकेच्यावतीने सर्वोतोपरी सहकार्य

  • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी नाशिक महानगरपालिकेच्यावतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन महापौर सतीष कुलकर्णी यांनी या बैठकीत दिले. संमेलनाच्या निमित्ताने नाशिकची संस्कृती जगासमोर यावी तसेच आरोग्य विषयक परिसंवाद व्हावा अशी अपेक्षा डॉ. मो.  स. गोसावी यांनी व्यक्त केली.
  • IMG 20210131 WA0029
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उत्राणे गावच्या विकासासाठी राज्यशासनाच्या वतीने सर्वोतोपरी मदत – छगन भुजबळ

Next Post

राहुल गांधींचा बिर्याणी खातानाचा व्हिडीओ व्हायरल

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
Es6isYUXUAM 4h

राहुल गांधींचा बिर्याणी खातानाचा व्हिडीओ व्हायरल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011