नवी दिल्ली – सर्वसामान्य नागरिक ज्या एका गोष्टीची डोळ्यात तेल घालून वाट पाहत आहेत ती म्हणजे कोरोनाची लस नक्की किती रुपयांना उपलब्ध होईल, याचा उलगडा झाला आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी यासंबंधीची घोषणा केली आहे. सिरम इन्स्टिट्यूट उत्पादन करीत असलेली कोविशिल्ड ही लस सरकारला केवळ २०० रुपयांना तर सर्वसामान्य नागरिकांना १ हजार रुपयांना उपलब्ध होणार आहे. विविध माध्यमांशी बोलताना पुनावाला यांनी ही घोषणा केली आहे. लसीला परवानगी दिल्याबद्दल पुनावाला यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान व विविध विभागांचे आभार मानले आहेत.
https://twitter.com/adarpoonawalla/status/1345605880381784067