आबुधाबी – जगातील सर्वात मोठी क्रिकेट प्रिमिअर लीग अशी ओळख असलेल्या इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) ला आजपासून (१९ सप्टेंबर) शानदार प्रारंभ झाला. तब्बल ५३ दिवस आयपीएल फिव्हर राहणार आहे. शुभारंभाचा सामना सायंकाळी ७.३० वाजता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सुरु झाला.
मुंबई इंडियन्स हा गतविजेता तर चेन्नई सुपरकिंग्ज हा उपविजेता राहिला आहे. येथील एकूण ३ स्टेडिअममध्ये आयपीएलचे ६० सामने होणार आहेत. अंतिम सामना पुढील महिन्यात १० नोव्हेंबरला होणार आहे. कोरोना सावटाच्या पार्श्वभूमीवर भारताबाहेर प्रथमच या सामन्यांचे आयोजन केले जात आहे.