२०१४ मध्ये काँग्रेसचा पराभव होण्यास डॉ. मनमोहन सिंग आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुस्तकात जबाबदार धरण्यात आले आहे. मुखर्जींनी पुस्तकात लिहिले आहे की, काही कॉंग्रेस सदस्यांचा असा विश्वास आहे की जर ते स्वत: पंतप्रधान झाले असते तर पक्षाची सत्ता गमावली नसती. मी राष्ट्रपती झाल्यानंतर कॉंग्रेस पक्षाने धोरण बदलल्याने दिशा गमावली. तर सोनिया गांधी या पक्षाची कामे सांभाळू शकल्या नाहीत. प्रणव मुखर्जी यांचे पुस्तक जानेवारी २०२१ मध्ये प्रकाशित होणार आहे.
मुखर्जी यांनी हे राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळातील अनुभवांवर हे पुस्तक लिहिले आहे. हे नवीन पुस्तक बंगालमधील एका दुर्गम गावातल्या अनुभवापासून ते राष्ट्रपती भवनाच्या तटबंदीपर्यंत पोहोचण्यापर्यंतच्या आकर्षक प्रवासाचे वर्णन करेल. ‘द प्रेसिडेन्शियल इयर्स’ हे पुस्तक जागतिक स्तरावर प्रदर्शित होईल, अशी घोषणा प्रकाशक रुपा बुक्स यांनी केली. मुखर्जी यांच्या पुस्तकाच्या चौथ्या खंडात राष्ट्रपती म्हणून त्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती आहे. ज्यात कठोर निर्णय, घटनात्मक औचित्य आणि त्यांचे मत यांचा समावेश आहे.