नाशिक – नाशिक जिल्ह्यात शरद प्रतिष्ठानचे कार्य पसरावे या उद्देशाने सौ प्रज्ञा भोसले तोरसकर यांची नाशिक जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे राज्यभर साहित्य, कला, सांस्कृतिक व इतर स्तरावर उल्लेखनीय कार्य असून, हे प्रतिष्ठान जनसामान्यांचे समस्या सोडविण्याचे कार्य करीत आहे. प्रज्ञा भोसले तोरसकर गेली अनेक वर्षे सांस्कृतिक, सामाजिक तसेच फिटनेस क्षेत्रात कार्यरत आहेत. समिज्ञा फाऊंडेशनच्या संस्थापिका आहेत, तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन ही त्या करीत असतात. सामाजिक क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार ही त्यांना मिळालेला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांची कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. या प्रसंगी शरद प्रतिष्ठान चे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक संदीप राक्षे, नाशिक जिल्हाध्यक्ष किरण सानप, सिनेमॅटोग्राफर मारूती तायनाथ तसेच समिज्ञा फाऊंडेशनचे अध्यक्ष समीर तोरसकर हे उपस्थित होते.