नाशिक – प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिस कवायत मैदानावर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. त्यानंतर मोजक्या तुकड्यांचे संचलन झाले. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, पोलिस आयुक्त दीपक पांडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यासह मान्यवर उपस्थित होते.
गतिमान, पारदर्शक व लोकाभिमुख सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासन वचनबद्ध – भुजबळ
नाशिक – नागरिकांची शासकीय कार्यालयातील कामे वेळेत होण्यासाठी, तसेच शासनाच्या योजनांचा व्यापकपणे लाभ घेता यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ई-ऑफीस, नाशिक मित्र वेबपोर्टल व ऑनलाईन आरटीएस या सेवांचे लोकार्पण करण्यात आले. या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना गतिमान, पारदर्शक व लोकाभिमुख सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासन वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
जिल्ह्यातील पोलिस संचलन मैदान येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी जनतेला संबोधित करतांना पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार डॉ. भारती पवार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, नाशिक महानगपालिकेचे आयुक्त कैलास जाधव, पोलिस आयुक्त दिपक पाण्डेय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांचेसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व सामान्य नागरिक उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य एक कृषीप्रधान, उद्यमशील आणि लोकसेवेमध्ये अग्रेसर राज्य आहे. राज्यातील सर्वच घटकांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने शासन व प्रशासनातील सर्व घटकांनी एकत्र येऊन आपले प्रजासत्ताक अधिक मजबूत करावे. यासोबतच जिल्हा प्रशासन आणि विविध विभागांनी केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. त्याप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव अजून संपलेला नसल्याने प्रत्येकाने मास्कचा नियमित वापर, सुरक्षित अंतर ठेवून वावर करणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूवर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून कोविड लसीकरणाच्या पहिल्या फेरीस १६ जानेवारी पासून सुरूवात करण्यात आली आहे. या लसीकरणाबाबत अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी आरोग्य रक्षणासाठी लसीकरणाचा लाभ घ्यावा.घेण्याचे आवाहन पालकमंत्री भुजबळ यांनी केले आहे.
विविध पुरस्कारांचे वितरण
याकार्यक्रमा दरम्यान पोलिस आयुक्तालयातील पोलिस उपनिरीक्षक समिरसिंह साळवे, यांना विशेष सेवा पदक देवून तर गुन्हे शाखेच्या आनंदा वाघ, प्रभाकर घाडगे, भिमराव गायकवाड, अनिल भालेराव, देवळाली कॅम्प येथील भगिरथ हांडोरे, विष्णू उगले, सुरेश माळोदे, प्रभाकर कोल्हे, देवराम सुरंजे, भारत पाटील, राजेंद्र ठाकरे या पोलिस अधिकारी व अमंलदार यांचा सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
पोलिस पत्नीं व कुटुंबियांचा सत्कार
कोविड कालावधीत कर्तव्यावर असतांना मृत्यू आलेल्या पोलिस विभागातील अरूण टोंगारे (पोलिस हवालदार), सुनिल शिंदे (सहायक पोलिस उपनिरिक्षक), विजय शिंदे (पोलिस हवालदार), राजेंद्र ढिकले (पोलिस हवालदार), दिलीप भदाणे (सहायक पोलिस उपनिरिक्षक), निवृत्ती जाधव (पोलिस हवालदार), निवृत्ती बंगारे (पोलिस हवालदार) यांच्या पत्नी व कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.
स्मार्ट ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण
जाखोरी (नाशिक) व भुत्याने (चांदवड) या ग्रामपंचायतीना जिल्ह्यात विभागून प्रथम पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जाखोरी (नाशिक), भुत्याने (चांदवड), नांदेसर (येवला), खुंटेवाडी (देवळा), हनुमंत पाडा (पेठ), पाळे खुर्द (कळवण), लोखंडेवाडी (दिंडोरी), वडझिरे (सिन्नर), उभाडे (इगतपुरी), जळगांव खुर्द (नांदगाव), साकोरे मिग (निफाड), तोरंगण (ह) (त्र्यंबक), दहिंदुले (बागलाण), खोकरी (सुरगाणा), मुंगसे (मालेगाव) या ग्रामपंचायतींना स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत पुरस्कार वितरण करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा पुरस्कार
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत तुषार भाऊसाहेब हिरे, कर्मवीर ॲड विठ्ठलराव हांडे जनता विद्यालय, चाटोरी, निफाड यास रूपये दहा हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार, रिश्यु अजय पांडे, बी.वाय.के. कॉलेज ऑफ कॉमर्स, नाशिक पाच हजार रूपयांचा द्वितीय पुरस्कार, दिप्ती पाटील, आयुर्वेद महाविद्यालय आणि आरोग्य शाळा रूग्णालय, गणेशवाडी, नाशिक हिस दोन हजार ५०० रूपयांचा तृतीय पुरस्कार तर मयुरी पंडीतराव अहिरे के.टी.एच.एम. कॉलेज, नाशिक व अंकिता सुदाम शिंदे यांना तृतीय पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.
उल्लेखनीय कामगिरी बजावणारे रुग्णालये
डॉ. नगरकर यांचे एचसीजी मानवता प्रा. लिमिटेड, नामको चॅरिटेबल ट्रस्ट एसजीएस कॅन्सर हॉस्पीटल, एस.एम.बी.टी. इन्सस्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्स ॲण्ड रिसर्च सेंटर, सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नाशिक, डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च सेंटर, आडगावं, नाशिक, श्री. साईबाबा हार्ट इन्सस्टीट्युट ॲण्ड रिसर्च सेंटर, समर्थ चाईल्ड हॉस्पीटल, आयुष हॉस्पीटल, श्री गुरूजी रुग्णालय, सिक्स सिग्मा मेडिकेअर ॲण्ड रिसर्च लिमिटेड या रुग्णालयांचा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य व प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याने सन्मानीत करण्यात आले आहे.
जिल्हा क्रीडा पुरस्कार
डॉ. सुरेखा सुदाम दप्तरे यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, दुर्गा प्रमोद देवरे वमंजुषा अशोक पगार यांना गुणवंत खेळाडू पुरस्कार महिला(थेट पुरस्कार), रनजित दिनेश शर्मा, गुणवंत खेळाडू पुरस्कार पुरूष (थेट पुरस्कार), भाग्यश्री दिपक चव्हाण गुणवंत खेळाडू पुरस्कार महिला, ऋत्विक राजेंद्र शिंदे गुणवंत खेळाडू पुरस्कार पुरूष, कु. स्वयंम विलास पाटील,गुणवंत खेळाडू पुरस्कार दिव्यांग खेळाडू, अथर्व ओंकार वैरागकर यांना राष्ट्रीय युवा महोत्सव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
वीरपत्नीस ताम्रपटाने सन्मानीत
जिल्हा सैनिक कल्या अधिकारी कार्यालयामार्फत युद्धात शहिद झालेल्या नितीन पुरूषोत्तम भालेराव, असिटंट कमान्डट यांच्या वीरपत्नी रश्मी नितीन भालेराव यांना पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ताम्रपट देवून सन्मानित करण्यात आले.
सामाजिक वनीकरण विभागाचे पुरस्कार
श्रीमती एस. एस. देशमुख, वनरक्षक, श्री. एस.एस. मुळीक, वाहन चालक विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण
शिष्यवृत्ती पुरस्कार
ग्रामीण भागातील भार्गव पंकज जाधव, इंग्लिश मिडीयम सेकेंडरी स्कूल, आराई बागलाण, शहरी भागातील अमनखान राजखान पठाण, सेक्रेडहार्ट कॉन्व्हेन्टस स्कूल, वडाळारोड, नाशिक, सी.बी.एस. ई./आय.सी.एस.ई. विभागाचे हर्षित विलास चोथे, अशोका युनिव्हर्सलस्कूल वडाळा, ओजस मनोज काबरा, एबिनेझर इंटरनॅशनल स्कूल, चांदशी नाशिक, अर्णव प्रमोद पाटील, नाशिक केंब्रिज प्राथमिक स्कूल इंदिरानगर नाशिक शहर या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता ५ वीच्या आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्त परीक्षा इयत्ता ८ वीच्या शहरी भागातून सोहम विनायक दुसाने, एम.एस.कोठारी अॅकेडमी नाशिक, सी.बी.एस.ई. व आय.सी.एस.ई. विभागातील खुशी राजेश कुचेरिया, सिम्बॉयसिस स्कूल, अश्विनीनगर नाशिक या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे.