नवी दिल्ली – भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) या जागेसाठी भरतीची संधी उपलब्ध झाली आहे. डाक विभागानं दिल्ली, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये जीडीएसच्या एकूण ३६७९ रिक्त जागांवर भरतीसाठीची जाहिरात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात काढली होती.
या पदांसाठी अर्ज करण्याची मुदत शुक्रवारी (२६ फेब्रुवारी) म्हणजेच आज संपणार आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केला नाही, ते ग्रामीण डाक सेवक भरती पोर्टल
appost.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अंतिम मुदतीनंतर करण्यात येणारे अर्ज बाद होतील.
दिल्ली, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सर्कलमध्ये ग्रामीण डाक सेवक पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड अथवा संस्थेची १० वीची परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. तसंच दहावीत स्थानिक भाषेचं शिक्षण घेणं आवश्यक आहे. जाहिरात दिल्याच्या तारखेपर्यंत उमेदवाराचं वय १८ ते ४० वर्षे असणं आवश्यक आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना जीडीएस पोर्टलवर भेट देऊन नोंदणीच्या लिंकवर क्लिक करून नोंदणीच्या पेजवर जावे. नंतर सांगितल्या गेलेलं विवरण भरून जमा करावे. दुसर्या टप्प्यात उमेदवारांना निर्धारित अर्जाचं शुल्क भरावं लागेल. अप्लिकेशन शुल्क ऑनलाइन जमा करावं लागेल. तिसर्या टप्प्यात इतर विवरण भरून तो अर्ज अंतिमरित्या जमा करावा.