नवी दिल्ली – इंडिया पोस्टने झारखंड आणि पंजाब पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवकांच्या एकूण १६३४ रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पोस्टल डिपार्टमेंट ग्रामीण डाक सेवक भरती जाहिरातनुसार १२ ऑक्टोबरपासून पंजाब आणि झारखंड या दोन्ही मंडळांमध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार पोस्टल विभागाच्या ग्रामीण डाक सेवक भरती पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ डिसेंबर २०२० आहे. ज्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थांकडून दहावी (माध्यमिक) उत्तीर्ण केले आहे त्यांना पोस्टल विभागात ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर १० नोव्हेंबर रोजी उमेदवारांचे वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी http://www.appost.in/gdsonline येथे भेट द्या.
असा करा अर्ज
झारखंड आणि पंजाब पोस्ट सर्कलमधील ग्रामीण डाक सेवकांच्या पदांवर भरतीसाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर स्टेज १ नोंदणीच्या लिंकवर क्लिक करावे. यानंतर तपशील भरल्यानंतर फोटो आणि स्वाक्षरीची स्कॅन कॉपी अपलोड करावी. स्टेज १ नंतर नोंदणी क्रमांक उमेदवारांना देण्यात येईल. यानंतर, उमेदवारांना स्टेज २ वर क्लिक करावे. यानंतर उमेदवारांना फी भरावी लागेल. यानंतर, उमेदवारांना स्टेज ३ वर क्लिक करावे. ऑनलाईन सबमिट केलेल्या अर्जाची सॉफ्ट कॉपी उमेदवारांनी सेव्ह करावी.