नवी दिल्ली – इंडिया पोस्टतर्फे पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक खातेदारांना इंटरनेट बँकिंग सुविधा देण्यात येणार आहे. Ebanking.indiapost.gov.in वर ग्राहकांना इंटरनेट बँकिंग सुविधेचा लाभ घेता येणार आहे. इंटरनेट बँकिंगसाठी ग्राहकांचे सिंगल किंवा जॉईंट अकाउंट असणे अनिवार्य आहे. या व्यतिरिक्त केवायसी हा सध्याचा महत्वाचा पर्याय आहे. त्याद्वारे डीओपी एटीएम / डेबिट कार्ड, मोबाइल नंबर, ईमेल आणि खाते क्रमांक अनिवार्य असून त्यानुसार इंटरनेट बँकिंगद्वारे एका खात्यातून दुसर्या खात्यात रक्कम पाठवता येणार आहे.
बँकेच्या खात्यातून आपल्या इंटरनेट बँकिंगद्वारे रिकरिंग डिपॉझिट (आरडी) खाते आणि पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) खात्यात ऑनलाईन रक्कम जमा करता येणार आहे. तसेच इंटरनेट बँकिंग सुविधेद्वारे आरडी खाते आणि एफडी उघडता तसेच बंद करता येणार आहे.
या स्टेप्स फॉलो करा…
१ – मुख्य शाखेत जाऊन संबंधित सुविधेसाठी अर्ज भरा
२ – अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडा
३ – प्रक्रिया पूर्णकेल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना दिली जाईल
४ – एसएमएसमध्ये देण्यात आलेल्या URLचा वापर करून इंटरनेट बँकिंगचा पर्याय निवडून ‘न्यू यूजर’ वर क्लीक करा
५ – आवश्यक तपशील भरून इंटरनेट बँकिंगला लॉगिन करा.