नाशिक – पोस्ट खात्यातील पेन्शनधारक, कौटुंबिक पेन्शनधारक, पोस्ट खात्यातून सेवानिवृत्त झालेले तसेच नाशिक विभागांतर्गत पेन्शन घेणाऱ्यांसाठी येत्या गुरुवारी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. प्रवर अधीक्षक डाक घर, नाशिक विभाग, मुख्य डाकघर कार्यालयात या पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रवर अधीक्षक डाक घर, नाशिक विभाग, मुख्य डाकघर यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
प्रसिध्दीपत्रकात नमूद केल्यानुसार पुर्णपणे कायदेशीर अडचणींचा समावेश, पॉलीसी प्रकरणाविषयी असलेल्या तक्रारी, पदोन्नती व वेननिश्चितीची प्रकरणे सदर पेंशन अदालतीत विचारात घेतली जाणार नाहीत. पेंन्शनधारकांनी त्यांचे विहित नमुन्यातील अर्ज २८ डिसेंबर पर्यंत प्रवर अधीक्षक डाक घर, नाशिक विभाग,मुख्य डाकघर यांच्या कार्यालयात पोहचतील अशा बेताने पाठवावेत. २८ डिसेंबर नंतर आलेले अर्ज पेंन्शन अदालतीत ठेवले जाणार नसल्याचे प्रवर अधीक्षक डाक घर नाशिक विभाग यांनी कळविले आहे.