नाशिक – आज कोरोनामुळे सरस्वतीचे मंदिर सुने झाले आहे. शाळेचा प्राण असलेले ‘विद्यार्थी’ घरुनच ऑनलाईन, ऑफलाईन पद्धत वापरून ज्ञानार्जन करीत आहेत. अशा पध्दतीच्या शिक्षणाने भलेही अभ्यास सुरु असला तरी विद्यार्थी शाळा कधी सुरु होणार याची वाट पाहत आहेत. शाळेच्या आठवणीने अस्वस्थ झालेल्या चौथी इयत्तेत शिकणा-या चिमुरडीने चक्क जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना भावनिक पत्र लिहून तिच्या भावनांना वाट करुन दिली असून शाळा लवकर सुरु व्हावी म्हणून देवाकडे प्रार्थना केली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनीदेखील पोस्टकार्डव्दारेच या चिमुरडीचे कौतूक करुन तिला पत्र पाठवले आहे.
कोरोनामुळे फेब्रुवारीपासून सर्व शाळा बंद आहेत. कोरोनामुळे सर्वच परिस्थिती बदलली असून दिवसभर विद्यार्थ्यांच्या कलकलाटाने गजबजलेल्या शाळांमध्ये स्मशान शांतता दिसून येत आहे. कधी मनात विचारसुद्धा आला नसेल, कुणी अशी कल्पनादेखील केली नसेल असे हे आजचे दिवस आहेत. शाळेच्या प्रशस्त इमारती जिथे कायम एक जिवंतपणा असायचा तिथे फक्त आणि फक्त शांतता आहे शिक्षक शाळेत येत नाहीत की विद्यार्थी. अशा या कठीण परिस्थितीत शिक्षक मुलांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत आहेत.
शाळेच्या आठवणीने अस्वस्थ झालेल्या आणि घरी बसून कंटाळलेल्या बारागाव पिंप्री येथील जिल्हा परिषद शाळेमधील चौथी इयत्तेत शिकणा-या तृषा एकनाथ नाईकवाडी या विद्यार्थींनीने आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगामध्ये चक्क पोस्टकार्डव्दारे स्वतच्या हस्ताक्षरात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना पत्र लिहले असून शाळा बंद असल्यामुळे घरी बसून कंटाळा आला असून ऑनलाईन अभ्यासापेक्षा फळयावरचा अभ्यासाचे वेध लागल्याचे तिने पत्रात नमूद केले आहे. तसेच शाळा बंद असल्यामुळे शाळेमधील गंमत, प्रार्थना, मैत्रिणीसोबतच्या गप्पा, खेळ सार बंद असल्यामुळे कंटाळा आला असून कोरोना लवकर संपूण शाळा सुरु होण्याची अपेक्षा तिने व्यक्त केली आहे. अनपेक्षितपणे आलेल्या या पत्राची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिका-यांनीही स्वहस्ताक्षरात पत्र लिहून चिमुरडीला उत्तर दिले असून आज सिन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर मुरकूटे यांच्या हस्ते सदरचे पत्र तिला प्रदान करण्यात आले.
जिल्हा परिषदेकडे दररोज फोन, ई मेल, व्हॉटसअपसारख्या माध्यमातून दररोज विविध प्रकारची संदेश येत असतात. पत्रलेखन जवळपास बंदझाल्यामुळे आजकाल पोस्टमनही सहसा दिसत नाहीत, बहुतेक वेळा लग्न पत्रिकाहि व्हाट्सएप वरून पाठवल्या जातातआणि मोबाइलमुळे तर पत्राची गरजच उरली नाही. पण तरीही हाताने लिहलेल्या पत्राची सर ईमेल, मॅसेस ला कधी येऊच शकत नाही. पत्रं हा जणू एकप्रकारे वर्तमान आणि भूतकाळ सांधणारा दुवाच होता जो आज मात्र कालवश झालाय. अनपेक्षितपणे आलेल्या चौथीच्या विद्यार्थींनीच्या पत्रामुळे समाधान वाटले. मात्र तिने लिहलेल्या कोरोनामुळे बदललेल्या परिस्थितीची वास्तविकताही समोर आणली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनीदेखील पोस्टकार्डव्दारेच या चिमुरडीचे कौतूक करुन तिला असे पत्र पाठवले