मुंबई – हिवाळी अधिवेशनावेळी विधानसभेच्या सभागृहात वेगळ्याच पोशाखात येणाऱ्या भाजप आमदार रवी राणा यांना विधानसभा अध्यक्षांनी बाहेर काढले. राणा हे पोस्टर असलेला पोशाख घेऊन सभागृहात आले. ते पाहून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले संतापले. ‘शेतकऱ्यांचं मरण, हेच राज्य सरकारचं धोरण. उद्धवा अजब तुझे सरकार’, अशा घोषणा यांनी सभागृहात दिल्या. पोस्टरवरही त्यांनी हेच लिहिले होते. अध्यक्षांनी या पोस्टरवर आक्षेप घेतला आणि राणा यांना सभागृहातून बाहेर जाण्याचे आदेश दिले. तरीही राणा घोषणा देत होते. त्यामुळे या प्रश्नावरुन सत्ताधारी व विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली. राणा यांचे निलंबन करावे, अशी मागणीही सत्ताधाऱ्यांनी केली.
पटोलेंनी दिला हा सज्जड दम
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे या प्रकारावरुन संतप्त झाले आणि ते खुर्चीतून उभी राहिले. त्यानंतर त्यांनी सभागृहात उपस्थित सदस्यांना म्हणाले की, अशा प्रकारचे पोशाख घालून जर कुणी सभागृहात येत असेल तर त्यांना गेटवरच थांबवावे. त्यानंतर पटोले यांनी गेट मार्शल यांना तशा सूचनाही दिल्या आहेत.