पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची जनतेला भावनिक साद घालणारी सोशल मीडियातील पोस्ट
नाशिक – नाशिक शहराबरोबरच जिल्ह्यातील तालुक्यातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आजपर्यंत हा आकडा १० हजाराच्या आसपास पोहचला आहे. त्यामुळे प्रशासनही सज्ज झाले आहे. या वाढत्या आकड्यामुळे जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी एक पोस्ट नागरिकांसाठी सोशल मीडियाच्या माध्यामातून टाकली आहे. त्यांनी जनतेला भावनिक साद घालत नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची जनतेला भावनिक साद..!!!
वाढत्या कोरोना संख्येमुळे व्यक्त केली चिंता
नमस्कार
मी सचिन पाटील पोलीस अधीक्षक नाशिक.
खरे म्हणजे आज माझ्या ग्रामीण जनतेला नम्र आवाहन करण्यासाठी आपल्याशी बोलत आहे.
वाढते कोरोना संक्रमण, लॉकडाऊन,कायदा सुव्यवस्था,गावागावात होणारी प्रचंड गर्दी व त्यातून वाढणारा बधितांचा आकडा हा चिंतेचा विषय ठरू पाहत असताना त्याला आटोक्यात आणण्यासाठी आपली सर्वांची साथ लागणार आहे हे मात्र आज स्पष्ट करू इच्छितो.गेल्या महिन्याभराच्या अभ्यास केला तर दररोज आकडे वाढतच चालले आहेत.यात आरोग्य यंत्रणा त्यांचे काम करतंय. स्थानिक प्रशासन त्याची निगा राखताय तर आपले पोलीस त्याला नियमांची चौकट आखून देतायेत.