नाशिक : महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये कर्मचारी वसाहतीत आत्महत्या केलेल्या विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त्त केल्याप्रकरणी सासरच्या तीघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तीघांनाही पोलीसांनी अटक केली आहे. मृत विवाहितेचा पती प्रमोद दिलीप गायकवाड (३४), सासु मिना दिलीप गायकवाड (५५), नणंद नुतन दिलीप गायकवाड (२७, रा. सर्व मनमाड, ता. नांदगाव) अशी संशयितांची नावे आहेत. पल्लवी प्रमोद गायकवाड असे आत्महत्या करणार्या महिलेचे नाव आहे. रविवारी (दि. १७) दुपारी तीनच्या सुमारास महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये कर्मचारी वसाहतीत वडिलांच्या घरात तीने आत्महत्या केली होती. याप्रकरणी मयत विवाहितेचे वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संशयित हे लग्न झाल्यापासून पल्लवी हिचा वेळोवळी शाररिक व मानसिक छळ करत होते. घर व चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत यासाठी हा छळ झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी गंगापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित तिघांनाही पोलीसांनी अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक कोकाटे करत आहेत
…….
दोघांचे मोबाईल लंपास
नाशिक : शहरातील बाजारपेठांमध्ये भूरट्या चोरांचे प्रमाण वाढले असून मोबाईल, पर्समधून दागिणे पळवण्याचे प्रकार घडत आहेत. नुकतेच विविध दोन ठिकाणी बाजारपेठेत खरेदी करत असलेल्या दोघांचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केल्याचे प्रकार समोर आले आहेत. योगेश विठ्ठल भाटी (रा. शांतीपार्क उपगनर ) यांनी तक्रार दाखल केलेल्या तक्रारीनुसार भाटी हे खरेदीसाठी मेनरोड व परिसरात फिरत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील मोबाईल लंपास केला. दुसरी घटना काठे गल्ली परिसरात घडली. येथील संकेत मनोज बुरड (रा. त्रिकोणी गार्डनजवळ) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ते जय शंकर गार्डन लॉन्स परिसरात भाजी खरेदी करत असताना त्यांनी शर्टच्या खिशात ठेवलेला मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. या दोन्ही याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक जाधवक व शेख करत आहेत.
………
विनयनगरला घरफोडी
नाशिक : बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी ८८ हजार रूपयांचे सोन्या – चांदिचे दागिणे व रोकड लंपास केल्याची घटना सोमवारी (दि.१८) दुपारी विनायनगर परिसरात घडली.
याप्रकरणी अभिषेक पगार (२२, रा. सिद्धीविनायक मंदिराजवळ, विनयनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पगार कुटुंबिय बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी सोमवारी भर दुपारी बारा वाजेच्या दरम्यान घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. बेडरूमधील लाकडी कपाटातून सोन्याचे दागिणे व ४० हजार रूपयांची रोकड असा एकुण ८८ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती उपनिरिक्षक श्रीवंत माने करत आहेत.
……..
बांधकाम साहित्याची चोरी
नाशिक : सुरक्षा भिंतीची जाळी तोडून आत ठेवेलेले बांधकामाचे २० हजार रूपयांचे साहित्य चोरट्यांनी पळवल्याची घटना एकलहरा परिसरात घडली. याप्रकरणी नरेद्र वेलजीभाई साखला (४९, रा.) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार साखला यांचे आरिंगळेमळा, एकलहरे, हिंगणवेढे रोड या भागात काम बांधकाम सुरू आहे. सहित्य ठेवण्यासाठी त्यांनी कंमपाऊंड तयार केले आहे. सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी सुरक्षा भिंतीची जाळी तोडून या ठिकाणी बांधकामासाठी ठेवलेले १५० नग लोखंडी प्रॉप्स चोरून पिकअप गाडीत भरून नेले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जी. आर. चिखले करत आहेत.
…….
ट्रक्टरच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
नाशिक : भरधाव ट्रक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.१८) पाथर्डीफाटा गौळाणे रोडवर घडली. भालचंद्र शंकर कोंबडे (६५, रा. यशवंतनगर, कोंबडेनगर, पाथर्डीगाव) असे या अपघातात मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकणी सुरेश कोंबडे यांनी तक्रार दाखल केली आहेत. त्यानुसार सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास भालचंद्र कोंबडे हे दुचाकीवरून मळ्याकडे येत असताना अज्ञात भरधाव ट्रक्टरने त्यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उपनिरिक्षक जगदाळे अधिक तपास करत आहे.
…….
तडीपार सराईत जेरबंद
नाशिक : शहर व जिल्ह्यातून दोन वर्षासांठी हद्दपार केले असतानाही शहरात फिरणार्या तडीपार सराईतास पंचवटी पोलीसांनी सोमवारी दुपारी पेठरोड परिसरातून अटक केले.दिपक किसन चोथे (३२, रा. अश्वमेध नगर, पेठरोड) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील गुन्हेगारी कमी करण्याच्या उद्देशाने परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्तांनी चौथे यास शहर तसेच जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. असे असतानाही तो शहरात आल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी कारवाई करत त्यास ताब्यत घेतले. चौथे यावर पंचवटी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.