नाशिक – पाथर्डी फाटा येथील एक्सेस बँकेचे एटीएम रात्री दीडच्या सुमारास फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाणे येथील पोलीस शिपाई दिनेश रमेश पाटील यांनी माहिती दिली आहे. २१ सप्टेंबर रोजी रोजी रात्री १.३० च्या सुमारास गस्ती दरम्यान पाथर्डी फाटा येथील सप्तशृंगी हॉस्पिटल जवळील ॲक्सिस बँकेच्या एटीएम सुस्थितीत नसल्याचे दिसून आले. पाटील यांच्या सतर्कतेमुळे तत्काळ चोरांना ताब्यात घेण्यात आले. पाटील यांच्या तत्परतेचे लाखो रुपयांच्या चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांना पाहून चोर वासननगरच्या दिशेने पळाले. पाटील यांनी लगोलग त्यांचा पाठलाग केला मात्र ते फरार झाले. लागलीच मदतीकरिता नाशिक नियंत्रण कक्ष यांना कळवले असता अंबड पोलीस स्टेशनचे रात्रगस्त अधिकारी पोलीस निरीक्षक निंबाळकर, इंदिरानगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश भामरे तसेच अंबड पोलिस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सदर परिसराला उद्यानाजवळ एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. चौकशी केली असता त्याचे रुपेश शिवाजी कहार (वय २१) राहणार कृष्णानगर ढोकणे मळा, गोपाल पार्क, अंबड येथील असून चार मित्रांच्या मदतीने एटीएम मशीन तोडून त्यातील रोख रक्कम चोरी करण्याची कबुली त्याने दिली आहे. सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्याकडून गुन्ह्यात एटीएम फोडण्यासाठी वापरलेली साधने जप्त करण्यात आलेली आहे. आरोपीच्या इतर चार सहकार्यांच्या नावाची नोंद करण्यात आली आली आहे. सदरची कामगिरी अंबड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निंबाळकर, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश भामरे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार पाळदे, पोलीस नाईक अखलाक शेख, पोलीस शिपाई जावेद खान तसेच राणेनगर बीट मार्शलचे कर्मचारी पोलीस शिपाई दिनेश पाटील व इंदिरानगरचे इतर पोलीस कर्मचारी यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पांडे पोलीस यांच्या सूचनांप्रमाणे व पोलीस उपायुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे तपास पोलीस उपनिरीक्षक जाकीर शेख हे करत आहेत.