मंगळवार, ऑगस्ट 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पोलिस आयुक्तालयात कोविड सेंटरचे उदघाटन

by Gautam Sancheti
सप्टेंबर 18, 2020 | 3:51 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20200918 WA0022

नाशिक – कोरोनाची भीती दूर करुन सेवा देणाऱ्या यंत्रणेने जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे आवाहन, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री  तथा जिल्ह्याचे  पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. पोलीस आयुक्तालय नाशिक येथे पोलीस कोविड केअर सेंटरचे उद्घाटन राज्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

पोलीस आयुक्तालय नाशिक येथे ‘पोलीस केअर सेंटर’ उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय,  मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामिण संदिप घुगे आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले की, कोरोना महामारीचा समना करतांना आर्थिक व्यवहास सुरु ठेवण्यासाठी लॉकडाऊनध्ये शिथिलता देण्यात आली आहे. या कालवधीत रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी शासनस्तरावर कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.  या संकटाचा समाना करण्यासाठी आपण सर्वानी एकत्र येवून काम करणे आवश्यक आहे. कोरोना कालावधीतील पोलीसांचे आणि डॉक्टरांचे कोविड योध्दा म्हणून केलेले कार्य हे उल्लेखनीय आहे. म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहीमेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीने आपली व आपल्या कुटुंबाची जबाबदारीने काळजी घेतली तर सर्वांना या आजारापासून दूर ठेवण्यास नक्कीच मदत होणार असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

ऑक्सिजन बेडचीही सुविधा

कोविड योध्दा म्हणून कोरोना कालावधीत पोलीस कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. हे कार्य करत असतांना त्यांनाही या आजाराचा सामना करावा लागला आहे. त्यांचे हे कार्य लक्षात घेता नाशिक पोलीस आयुक्तालय येथे ऑक्सिजन बेड असलेले ३५ खाटांचे पोलीस कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या सेंटरच्या माध्यमातून संशयित रुग्ण तसेच प्रत्यक्ष पॉझेटीव्ह रुग्णांवर उपचार केले जाणार आहे. हे उपचार करीत असतांना नैसर्गिक उपचार पध्दती अवलंब केला जाणार असून, मानसिक आरोग्य आणि योग पध्दतीचाही अवलंब केला जाणार असल्याची माहिती  पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय् यांनी या कार्यक्रमातून दिली आहे. कोविड सेंटर साठी दोन रुग्णवाहीका उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. या कोविड सेंटर मध्ये भरती झल्यावर नातेवाईकांना दिवसातून दोन वेळा सोशल डिस्टंसिगचे नियम पाळून भेटण्याची मुभा देण्यात आली आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या नातेवाईकांना हे सेंटर बघण्यासाठी उद्या दिनांक १९ सप्टेंबर रोजी एक दिवस खुले करण्यात येणार असल्याचेही पाण्डेय् यांनी यावेळी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महिला बचत गटांची उत्पादने आता ऐका क्लिकवर

Next Post

त्र्यंबक, इगतपुरीत ७च्या आत घरात; पालकमंत्र्यांचे निर्देश

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20200918 WA0023

त्र्यंबक, इगतपुरीत ७च्या आत घरात; पालकमंत्र्यांचे निर्देश

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आपल्या कामामध्ये सातत्य ठेवावे, जाणून घ्या, बुधवार, २० ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 19, 2025
rain1

राज्यात या तारखेपासून पावसाचा जोर कमी होणार, बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

ऑगस्ट 19, 2025
प्रातिनिधिक फोटो

गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या…मुख्यमंत्री फडणवीस यांनी मानले केंद्राचे आभार

ऑगस्ट 19, 2025
BVG e1755609847602

मुक्त विद्यापीठाबरोबर ऐतिहासिक सामंजस्य करार…भारतातील हे अत्याधुनिक व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र होणार

ऑगस्ट 19, 2025
result

TAIT परीक्षेचा निकाल जाहीर…१०७७८ उमेदवार यशस्वी, ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

ऑगस्ट 19, 2025
crime1

प्लॉट खरेदी विक्री व्यवहारात लाखों रूपयांना गंडा…फसवणुकीचा गुन्हा दाखल

ऑगस्ट 19, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011