नाशिक – पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी रविवारी (२० सप्टेंबर) सकाळी पदभार स्विकारला. डॉ. आरती सिंग यांची अमरावती येथे बदली झाल्याने नाशिकच्या पोलिस अधिक्षकपदी पाटील यांची नियुक्ती झाली. त्यांनी सूत्रे स्विकारली असून ग्रामीण भागातील कोरोनाची स्थिती हाताळण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. तसेच, आगामी सण-उत्सवांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे.