नाशिक – त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीतील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. अकादमीतील १६७ प्रशिक्षणार्थी यापूर्वी कोरोना बाधित आढळले होते. आता त्यात भर पडली असून आणखी ८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सद्यस्थितीत ठक्कर डोम येथील कोविड सेंटरमध्ये १६० प्रशिक्षणार्थी उपचार घेत असल्याची माहिती ठक्कर डोम कोविड सेंटर प्रमुख डॉ. राजेंद्र भंडारी यांनी दिली आहे.