नाशिक – जिल्ह्यात कामगार चळवळीवर चाललेल्या पोलिसांच्या दपडपशाही विरोधात भारतीय ट्रेड युनियन (सीटू) ने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. डॅा. बाबासाहेब आंबेडकर पुतळयासमोर हा मोर्चा आल्यानंतर येथे पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कॅा. देविदास आडोळे यांना दिलेल्या हद्दपारीची नोटीस मागे घ्या, फॅब कंपनीतील कामगारावर अमानुषपणे हल्ला करणा-या अप्पर पोलिस शर्मिला वालावलकर, पोलिस निरीक्षक विश्वजीत जाधव यांना निलंबीत करा व कामगारावरील खोटे गुन्हे मागे घ्या या मागण्या करण्यात आल्या. त्यानंतर सीटूतर्फे या विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी यांना पाच जणांच्या शिष्टमंडळाने दिले.