निफाड – कोरोनाकाळात वर्षभर पोलिसांचे मनोधैर्य वाढवणाऱ्या चिमुकल्या गार्गीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दखल घेत कौतुक केले. कोरोनाला गत दीड वर्षापासून जवळून अनुभवणारे पोलीस आजही तितक्याच संयमाने,धैर्याने सुनसान रस्त्यावर ड्युटी बजावत आहेत. आपला एक एक सहकारी बाधित आढळून येत असतानाही पोलीस कर्मचाऱ्यांचे मन विचलित झाले नाही. जनतेवर आलेले संकट रस्त्यावर उभे राहून छातीवर झेलत आहेत.
गतवर्षी महाराष्ट्रात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावली ती पोलिसांनी. कोरोनाच्या रूपाने आलेले संकट निधड्या छातीवर पेलण्यासाठी पोलीस सज्ज झाले.जनता घरामध्ये सुरक्षित असताना पोलीस मात्र सुनसान रस्त्यावर ड्युटी बजावू लागले.लढाईत जसा एकेक मावळा धारातीर्थी पडत होता,तसे पोलीस दलातील कर्मचारीही कोरोनाच्या विषाणूमुळे धारातीर्थी पडत होते,तर अनेकजण कोरोनाबाधित आढळून येत होते.तरीसुद्धा पोलिसांनी आपले कर्तव्य अत्यंत उत्कृष्टरीत्या पार पाडले.अशाच एकदा चांदोरी ता निफाड येथील कु.गार्गी सागर आहेर या चिमुकलीने चांदोरी गावात गस्तीवर असलेल्या पोलीस बांधवांना गुलाबाचे फुल देत ऋण व्यक्त केले होते.ती आठवण तसेच शिवजयंती निमित्त व्हायरल झालेले व्हिडीओ व सध्या मास्क वापरण्या संदर्भात चिमुकल्या गार्गीने सोशल मीडियावर केलेले आवाहन बघत नाशिकचे जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी चांदोरी येथे भेट चिमुकल्या गार्गीचे भेट घेत कौतुक केले. या प्रसंगी गार्गीचे कुटूंबीय,सायखेडा येथील पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ आदी उपस्थित होते.