नवी दिल्ली – केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील देशातील विविध राज्यात सुमारे ५ लाख ३१ हजार ७३७ रिक्त आहेत. परंतु महिलांच्या संख्येत १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. १ जानेवारी २०२० रोजीच्या स्थितीच्या आधारे जारी केलेल्या ताज्या अहवालात पोलिस संशोधन व विकास ब्युरो (बीपीआरडी) यांनी ही माहिती दिली आहे.
या अहवालात म्हटले आहे की, देशभरातील एकूण मंजूर झालेल्या २६ लाख २३ हजार २२५ पदांपैकी सध्याची संख्या २० लाख ९१ हजार ४८८ आहे. त्यापैकी महिलांची संख्या २ लाख १५ हजार ५०४ म्हणजेच सुमारे १०.३० टक्के आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पोलिस दलात महिलांची संख्या १६ टक्के जास्त आहे.
अहवालानुसार केंद्रीय सशस्त्र दलात एकूण मंजूर पदे ११ लाख ०९ हजार ५११ आहेत. वास्तविक संख्या ९ लाख ८२ हजार ३९१ आहे. म्हणजेच एक लाख २७ हजाराहून अधिक पदे रिक्त आहेत. केंद्रीय सशस्त्र दलात महिलांची संख्या २९ हजार २४९ (तीन टक्क्यांपेक्षा कमी) २.९८ टक्के आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पोलिस दलात महिलांची संख्या १६ टक्के जास्त आहे. अहवालानुसार केंद्रीय सशस्त्र दलात एकूण मंजूर पदे ११,०९,५११ आहेत. वास्तविक संख्या ९,८२३९१ आहे. म्हणजेच एक लाख २७ हजाराहून अधिक पदे रिक्त आहेत. केंद्रीय सशस्त्र दलात महिलांची संख्या २९,२४९ (तीन टक्क्यांपेक्षा कमी) २.९८ टक्के आहे.