नाशिक – मराठा साम्राज्याच्या इतिहासात अजरामर असलेले थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळातील महत्त्वाची कागदपत्रे सिन्नरमध्ये अत्यंत वाईट अवस्थेत असल्याची बाब समोर आली आहे. सिन्नर जवळील डुबेरे येथे पेशवे वाडा असून या वाड्यालाही मोठी अवकळा आली आहे. तसेच, या वाड्याच्या आत पेशवेकालिन कागदपत्रांची अत्यंत वाईट अवस्था दिसून येत आहे. यासंदर्भातील काही फोटो सोशल मिडियात व्हायरल झाले असून या परिस्थितीकडे पुरातत्व विभाग, केंद्र सरकार, राज्य सरकार, पर्यटन मंत्रालय यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. ऐतिहासिक कागदपत्रांची जपणूकही आपण करु शकत नसल्याची बाब यानिमित्ताने समोर येत आहे. तसेच, पुरातत्व विभाग किती निद्रिस्त आहे, असा सूरही युवकांकडून आळवला जात आहे.
https://twitter.com/malhar_pandey/status/1376514762528317442