नाशिक – भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांची केंद्र शासनाने नॅशनल बोर्ड ऑफ मायक्रो, स्मॅाल अॅण्ड मेडियम एन्टरप्राइझेस (MSME) येथे संचालक म्हणून नियुक्ती केलीआहे. या निुयक्तीचे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. गुरुवारी उद्योग आघाडीची महाराष्ट्र प्रदेश कार्यसमीती बैठक प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत दादा पाटील ,संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांच्या उपस्थितीत पुणे सूरु असतानाच ही बातमी आली. या बैठकीत प्रदेशाध्यक्षां चंद्रकांत दादा पाटील व प्रदेश उपाध्यक्ष माधवराव भांडारी यांनी विशेष अभिनंदन व सत्कार केला. विशेष म्हणजे पेशकार या बोर्डवर नियुक्ती मिळणारा नाशिकचा पहिलेच उद्योजक ठरले आहे.
अतिशय सामान्य कार्यकर्त्याला या अशा देशव्यापी बोर्डावर निवड करुन पक्षाने खूप मोठा विश्वास दाखवला आहे. या मुळे उद्योग क्षेत्रातील अनेक अपेक्षित असे काम देशभर करण्याची संधी मिळणार असल्याचे प्रदीप पेशकार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सर्वांचे आभारही मानले.