नवी दिल्ली – प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर सैन्य विभागाने कर्तव्यदक्ष जवानांसाठी काल रविवारी देशभरात आयोजित राष्ट्रीय सैन्य भरती परीक्षा रद्द केली आहे. वरिष्ठ सैन्य अधिकारी या संबंधित माहिती म्हणाले की, या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. सैन्य भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टचारी वर्तनाची गय केली जाणार नाही, सेना योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी गैरकारभार सहन करत नाही.
तसेच या अधिकाऱ्याने सांगितले की, पुण्याच्या स्थानिक पोलिसांसमवेत संयुक्त कारवाई दरम्यान शनिवारी रात्री सैनिक भरतीसाठी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचे (लीक झाल्याचे ) प्रकरण शनिवारी रात्री उशीरा उघडकीस आले. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी होणारी परिक्षा रद्द करण्यात आली आहे. या संदर्भात पुढील तपास सुरू असून भरती प्रक्रियेत पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.