नाशिक – पेन्शन घेण्यासाठी बॅँकेत जात असताना भरधाव मोटारसायकलने धडक दिल्याने जखमी झालेल्या ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नरोत्तम जगन्नाथ निकुम असे मृत ज्येष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी भरत नरोत्तम निकुम (वय ३०, फ्लॅट नं. १६, यशोधन ईलाइट, मराठानगर, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता नरोत्तम निकुम हे पेन्शन घेण्यासाठी बॅँकेत चालले होते. यावेळी रस्त्याच्या कडेला उभे असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या मोटारसायकल (क्र. एम एम १५, जीटी ३११३) ने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांना हातापायास गंभीर दुखापत झाली.. त्यामुळे निकुम यांना जयराम हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मोटारसायकल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरिक्षक जे. एम. गांगुर्डे तपास करत आहे.