पेठ – शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पेठ शहर व तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. माकपा व किसान सभेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करत भारत बंदला पाठींबा देण्यात आला. सकाळ पासूनच शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट होता. गुजरात राष्ट्रीय महामार्गावरील चौफूलीवर पेठ तालुका किसान सभा, माकपा, शिवसेना, राष्ट्रवादी व कॉग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने रास्ता रोको आंदोलन करत भारत बंदला पाठिंबा दर्शवला. यावेळी डीवायएफआयचे जिल्हाध्यक्ष कॉ. इंद्रजीत गावीत, तालुकाध्यक्ष कॉ. देवराम गायकवाड, मनोज घोंगे, दामू राऊत, विशाल जाधव, याकूब शेख, कांतीलाल राऊत, गिरीश गावीत सचिव कॉ. नामदेव मोहांडकर, कॉ. महेश टोपले, कॉ. जाकीर मनियार,यांचेसह शेतकरी, कामगार, शेतमजूर सहभागी झाले होते. पेठ पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला.