नाशिक – पेठ तालुका पुन्हा कोरोनामुक्त झाला असून सध्या तेथे उपचार घेत असलेला एकही कोरोना रुग्ण नाही. त्यानंतर आता सुरगाणा आणि त्र्यंबकेश्वर हे दोन्ही तालुके कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावरच आहे. या दोन्ही तालुक्यात अत्यल्प रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. त्यामुळे कोरोनामुक्तीत या तिन्ही आदिवासी तालुक्यांनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे.
शहरासह जिल्ह्यात गुरुवारी (१० डिसेंबर) २८३ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २०७ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख ०४ हजार ५३४ झाली आहे. ९९ हजार १८६ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ८४६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ३ हजार ५०२ जण उपचार घेत आहेत.
गुरुवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १४२, ग्रामीण भागातील १३१, मालेगाव शहरातील ६ तर जिल्ह्याबाहेरील ४ जणांचा समावेश आहे. तर, सर्वच्या सर्व ६ मृत पावलेले हे नाशिक शहरातील आहेत.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६८ हजार ७१६. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ६५८. पूर्णपणे बरे झालेले – ६५ हजार ७१०. एकूण मृत्यू – ९२८. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार ०७८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९५.६३
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३० हजार ४७६. पूर्णपणे बरे झालेले – २८ हजार ५४२. एकूण मृत्यू – ७०२.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार २३२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.६५
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ४१८. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ०९३. एकूण मृत्यू – १७२.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १५३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.६४
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी