नवी दिल्ली – पेट्रोल डिझेलची किंमत सध्या रोज बदलत असतात. मात्र, हे दर नक्की काय आहेत हे पेट्रोल पंपावर जाण्याशिवाय आपल्याला घर बसल्याच कळू शकते. त्यासाठी आपण मोबाईलवर एसएमएस करुन ही माहिती प्राप्त करु शकतात.
आपण एसएमएसद्वारे दररोज आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत देखील तपासू शकता. त्यासाठी खालील बाबी लक्षात घ्या
इंडियन ऑइल (IOC) ग्राहक
RSP <डीलर कोड> असे लिहून 9224992249 या क्रमांकावर मेसेज पाठवू शकता. त्यानंतर आपल्याला दर कळू शकतात.
एचपीसीएल (HPCL) ग्राहक
HPPRICE <डीलर कोड> असे लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवू शकतात.
बीपीसीएल (BPCL) ग्राहक
RSP <डीलर कोड> असे लिहून 9223112222 या क्रमांकावर मेसेज पाठवू शकतात. त्यानंतर इंधनाचे दर आपल्याला मिळू शकतात.
सरकारला उत्पन्न
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर बाबी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. केंद्र सरकारची उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारचे व्हॅट काढून टाकल्यास डिझेल आणि पेट्रोलचा दर लिटरमागे सुमारे २ रुपये असेल, परंतु केंद्र किंवा राज्य सरकार दोघेही कोणत्याही किंमतीवर हा कर काढून टाकू शकत नाहीत. कारण कमाईचा मोठा भाग येथूनच येतो. यामुळे सरकारच्या पैशात वाढ होते.
रोज ६ वाजता बदल
आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या किंमती आणि परकीय चलन दरांनुसार दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. तेल विपणन कंपन्या दरांचा आढावा घेतल्यानंतर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल आणि डिझेल दरात दररोज सकाळी ६ वाजता बदल होतात.