नवी दिल्ली – इंधनदरवाढीविरोधात जनमानसात असंतोष पसरलेला असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानं पेट्रोल आणि डिझेलचे दर गुरुवारी तिसर्या दिवशी वाढले आहेत.
पेट्रोलचे दर २४ ते २५ पैशांनी वाढले तर, डिझेलचे दर ३० ते ३१ पैशांनी वाढले आहेत. मुंबईमध्ये इंधनदरवाढीनं उच्चांक गाठला आहे. त्यामुळे लोकांच्या रोषात आणखी भर पडली आहे.
राजधानी दिल्लीत पेट्रोल ८७.८५ रुपये प्रतिलिटर, मुंबईत ९४.३६ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. इंधनाचे दर सतत वाढत गेल्यास लवकरच शंभरी गाठेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोलचे दर
मुंबई – ९४.३६ रुपये प्रतिलिटर
पुणे – ९३.५४ रुपये प्रतिलिटर
नाशिक – ९३.६५ रुपये प्रतिलिटर
नागपूर – ९४.३३ रुपये प्रतिलिटर
राज्यातील प्रमुख शहरातील डिझेलचे दर
मुंबई – ८४.९४ रुपये प्रतिलिटर
पुणे – ८२.८१ रुपये प्रतिलिटर
नाशिक – ८२.९२ रुपये प्रतिलिटर
नागपूर – ८४.९१ रुपये प्रतिलिटर