मालेगाव – २०१४ पूर्वी इंधनाचे दर थोडे वाढले कि, “बहुत हुई मॅंहगाई की मार…” अशी घोषणा देणारे भाजपा नेते आता पेट्रोलचे भाव ९० रुपये प्रती लिटरच्या पुढे गेले तरी शांत का असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांनी केला आहे.
मालेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष संदीप पवार, प्रांतिक सदस्य डॉ.जयंत पवार, राजेंद्र भोसले, तालुका पक्ष निरीक्षक यशवंत शिरसाठ, सुनील कबाडे, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, युवक अध्यक्ष अरुण अहिरे, रतन हलवर, विजय दशपुते आदींची भाषणे झाली.
केंद्र सरकारने आणलेला कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याने त्याविरोधात देशभरात जनमत एकवटले आहे. या अध्यादेशाबाबत शेतकऱ्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत,त्यामुळे हे कायदे रद्द करावेत.सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे जर शेतकरी हिताचे नसतील तर अशा कायद्यांचा उपयोग काय ? असा सवाल देखील यावेळी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार यांनी केला आहे. केंद्रातील भाजपाचे सरकार शेतकरी विरोधी असून २०१४ ला सत्तेत आल्यापासून सरकारकडून शेतक-यांसाठी कुठलाही दिलासादायक निर्णय होत नसल्याची टिकाही यावेळी ॲड. पगार यांनी बोलतांना केली आहे.
तालुकाध्यक्ष संदीप पवार यांनी प्रास्तविकात कामकाजाचा आढावा सादर केला. मालेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसची कार्यकारिणी यावेळी जाहीर करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना यावेळी नियुक्तीपत्रे देखील देण्यात आली.बैठकीस विनोद चव्हाण, विनोद शेलार, धनंजय पाटील, किशोर इंगळे, हेमलता मानकर, सलीम रिझवी, डॉ.मुजीब रहेमान, माधव पवार, प्रकाश वाघ, चंद्रकांत अहिरे, प्रवीण पगार, अशोक वाघ, आबा साळुंके, अशोक ह्याळीज, बाळासाहेब बागुल, भगवान देवरे, राहुल देसले, राजेंद्र पवार, संतोष निकम, अशोक पवार, चंद्रकांत पवार, भाऊसाहेब पवार, कृष्णा बच्छाव, प्रभाकर पवार, मच्छिंद्र साळुंके, विनायक माळी, प्रशांत महाजन, गोकुळ गर्दे, बाजीराव सरोदे, मनोज गांगुर्डे, भाऊसाहेब हिरे, शनेश्वर बच्छाव, निवृत्ती कुवर, समाधान देवरे, दीपक गोसावी, अनिल पगार, प्रवीण पगार, संदीप निकम, माणिक नेमणार, सोमा काळे, भूषण पाटील, जितेंद्र खैरनार, कृष्ण सपकाळ, दीपक दळवी, विनोद सकट, दीपक केसरकर आदी उपस्थित होते.